नवी दिल्ली: भारतीय संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव करत Blind Cricket World Cup 2022 जिंकला. भारताच्या दृष्टिहीनांच्या संघाने तिसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकला आहे.
माहितीनुसार, भारताने प्रथम फलंदाजी करताना २७८ धावा केल्या होत्या आणि बांगलादेशला प्रत्युत्तरात ३ बाद १५७ धावा करता आल्या. भारताने १२० धावांनी हा सामना जिंकला. भारताचा सलामीवीर वी राव १० धावा करून माघारी परतला, पण सुनील रमेशने ६३ चेंडूंत नाबाद १३६ धावा केल्या. कर्णधार ए के रेड्डीनेही ५० चेंडूंत १०० धावांची खेळी केली आणि संघाला २७८ धावांपर्यंत नेले
दरम्यान, भारतीय संघात ललित मीना, प्रवीण कुमार शर्मा, सुजीत मुंडा, नीलेश यादव, सोनू गोलकर, सोवेंदू महाता, अजय कुमार रेड्डी (क), व्यंकटेश्वर राव (वीसी), नकुला बदनायक, इरफान दिवान, लोकेशा, टोमपाकी दुर्गा राव, सुनील रमेश, ए रवी, प्रकाश जयरामय्या, दीपक मलिक, धिनगर जी, यांचा समावेश आहे.
