मुंबई: शरद पवार यांनी आजच्या मोर्चाला संबोधित करताना थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
शरद पवार म्हणाले, “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल टिंगलटवाळी करत आहेत. ही टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे, अशा राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची लवकर पदावरून हकालपट्टी करा. मी लोकशाही मार्गाने सांगतो. लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा संतप्त इशाराच राष्ट्रवादीचे सर्वसेरवा शरद पवार यांनी केंद्र सरकारला आज दिला.

तसेच ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील काही सन्मान चिन्हं आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सन्मानीय स्थानं आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोलतात. राज्यात असा राज्यपाल पाहिला नाही. शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. या राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवला. पण आजचे राज्यपाल महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
दरम्यान, ते महाविकास आघाडीच्या महामोर्चाला संबोधित करत होते.