मुंबई: महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी राज्यात आज महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणातून सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले की, युगपुरुष शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. महाराजांच्याबाबत बेताल वक्तव्य करतात. यामागे मास्टरमाईंड कोणा आहे? एकदा चूक झाली की माफी मागता येते, पण असे घडत नाही. राज्यपाल बोलले की मंत्री बोलतात आणि वारंवार बोलतात. यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. पण, या राज्यात महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम होते यामागे कोण मारस्टरमाईंड आहे? संविधान आणि कायद्याचा विसर या सरकारला पडला आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महापुरुषांचे अपमान होत आहे,असा आरोप करत आपण एकजूटता दाखवली पाहिजे, सरकारला जागा दाखवण्याचे काम करुया असा हल्लाबोल अजित पवारांनी सरकारवर केला आहे.