मुंबई: भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येत आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांनी घातलेल्या अटींवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
राऊत म्हणाले, “हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, या अटींपेक्षाच या सरकारने आम्हाला भाषण लिहून द्यायचे होते. नेत्यांना भाषण लिहूनच दिली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे तुम्ही त्यांना अटी घालता हे योग्य नाही.

तसेच ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा राज्यपाल राजभवनात बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबडेकारांचा अवमान करणारा मंत्री तुमच्या बाजूला बसला. एक दिल्लीत बसला आणि तुम्ही म्हणताय आम्हाला काम नाही? यांचा मेंदू आहे कुठे? परवा दिल्लीत मेंदू गहाण ठेवून आलात का? शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणे याचा अर्थ काम नाही? असा संतापही राऊतांनी यावेळी व्यक्त केला.