Latest Marathi News

‘या’ मविआच्या नेत्यांच्या उपस्थितीत महामोर्चाला सुरुवात; मोर्चातून केली ‘हि’ मोठी मागणी!

0 284

मुंबई : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढला आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात झाली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून दूर करण्याची मागणी या आंदोलनात अग्रस्थानी आहे.

 

माहितीनुसार, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, सपाचे अबू असीम आजमी, शेकापचे जयंत पाटील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप मोर्चात सहभागी झाले आहेत.

Manganga

 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.ही या मोर्चातील आग्रही मागणी आहे. शिवाय महापुरूषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची मागणी करावी, अशीही मागणी महाविकास आघाडीची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!