मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फुट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “शिंदे गटातील तीन आमदार आमच्या संपर्कात आहे. तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आमदारांवर विश्वास असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल असे देखील मिटकरी म्हणाले. आमच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही अस देखील अमोल मिटकरी यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.