मुंबई शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या एका लग्नात समोरासमोर आले होते. यावेळी मुंबई महापालिकेचे नगरसेवक नील सौमय्या देखील सोबत होते.
माहितीनुसार, या लग्न सोहळ्यात किरीट सोमया आणि किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची समोरासमोर भेट झाली. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी तर किशोरी पेडणेकर यांना वाकून नमस्कार करत तब्येतेची विचारपूस केली.

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर असलेल्या किशोर पेडणेकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप किरीट सोमय्यांनी केले. मात्र या भेटीदरम्यान त्यांच्यातील मतभेदाचा एक अंशही तिथे दिसला नाही.