मुंबई: महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत शनिवारी 17 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्चाला आमदार बच्चू कडू यांनी देखील अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.
“शब्द चुकने आणि जाणून-बुजून बोलणं यात मोठा फरक आहे. तो कोणत्याही पार्टीचा असो,पदाचा असो त्याला रट्टा दिलाच पाहिजे. पण जाणून बुजून न बोलता जर त्याचं कोणी राजकारण करत असेल ते महापुरुषाबद्दल राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

तसेच ते पुढे म्हणाले, “राज्यपालांनी महापुषांबद्दल असं पुन्हा पुन्हा बोलू नये. तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यानी सांभाळून महापुरुषाबद्दल बोलले पाहिजे. उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला समर्थनच दिले आहे.
दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये बोलत होते.