“लोकं भाजपच्या तोंडात शेण घालताहेत, महाराष्ट्रातील सरकार लवकर कोसळणार” : ‘या’ शिवसेना नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य!
मुंबई :बाबासाहेब आंबेडकर हे या महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचा आत्मा आहे. भाजपवाल्यांना कळत नाही का. महाराष्ट्रातील सरकार लवकर कोसळणार आहे. त्यामुळं यांना वैफल्य आलंय, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत की नाही. आम्ही म्हणतो आहेत. ते महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. भाजपला बाबासाहेबांचं राजकारण करायला लाज वाटली पाहिजे, अन्यथा जनता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. असं म्हटल्यावर कुणाला माफी हवी असेल, तर त्यांच्या डोक्यातल्या किड्यांचं संशोधन करावं लागेल. त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळताहेत. हे पाहावं लागेल, असेही वक्तव्य संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, भाजपनं लोकमताचा पाठिंबा यांनी गमावला आहे. लोकं यांच्या तोंडात शेण घालताहेत. मग असे काहीतरी उद्योग सुरू करायचे आणि महापुरुषांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून करायची, असा आरोपही संजय राऊत यांनी भाजपवर केला.