“…तर भाजप-शिंदे गटाची युती देखील झाली नसती, त्यामुळे महाविकास आघाडीच्या माेर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही”
मुंबई: भाजप-शिंदे सरकारच्या विराेधात महाविकास आघाडीने महामाेर्चाची हाक दिली आहे. या माेर्चावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे राहुल शेवाळे म्हणाले आहेत.
शेवाळे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या माेर्चाला गांभीर्याने बघण्याची गरज नाही, अडीच वर्षात जे मुद्दे पुर्ण झालेले नाहीत तेच मुद्दे या माेर्चात आहेत, महाविकास आघाडीच्या काळात जर हे मुद्दे पुर्ण झाले असते तर हा माेर्चा काढण्याची वेळ आली नसती असे शेवाळे म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षात या विषयांना न्याय दिला असता तर भाजप-शिंदे गटाची युती देखील झाली नसती, तर उध्दव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यापासून दुर जात असल्याची टिका देखील शेवाळे यांनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने उद्या मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चाचे टिझर देखील रिलीज करण्यात आले आहे. झरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि चंद्रकांत पाटील यांची वादग्रस्त विधाने दाखवण्यात आली आहेत. तसेच महापुरुषांचा अवमान सहन तरी किती करायचा? असा सवालही या टीझरमधून करण्यात आला आहे.