Latest Marathi News

BREAKING NEWS

‘ही थेरं भारतात चालणार नाही’”: ‘पठाण’ चित्रपटातील दीपिकाच्या कपड्यावरून वादग्रस्त वक्तव्यात भर!

0 580

मुंबई: शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या ‘पठान’ चित्रपटाची सर्वांना बरीच प्रतीक्षा होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येत आहे तसे या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेण्यात आला. आता यामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांची भर पडली आहे.

 

मुकेश खन्ना म्हणाले, ‘लहान मुले आता टीव्ही आणि चित्रपट बघत मोठी होत आहेत. म्हणूनच सेन्सॉर बोर्डाने अशा गाण्यांना पास करू नये.’ मुकेश खन्ना यांनी सेन्सॉर बोर्डवरही प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, ‘सेन्सॉर बोर्ड सुप्रिम कोर्ट नसून त्याचा नक्कीच विरोध केला जाऊ शकतो’.

Manganga

 

‘आपला देश स्पेन नाही, त्यामुळे अशी गाणी बनवू नका. आता अर्ध्या कपड्यांमध्ये गाणी बनत आहेत. उद्या बिना कपड्यातही गाणी बनतील. गाणे बनवणाऱ्यांना माहित नाही का भगवा रंग धर्म आणि संप्रदायासाठी महत्वाचा आहे. हे खूप संवेदनशील आहे, ज्याला आपण भगवा म्हणतो तो शिवसेनेचं झेंडा अणे आणि माच्या ‘आरएसएस’चा पण. जा गाणे बनवणाऱ्यांना हे माहित आहे तर त्यांनी असे का केले? अमेरिकेत त्यांच्या झेंड्याच्या रंगाची बिकनी घालू शकतात. पण भारतात नाही,’ असे त्यांनी वक्तव्य केले.

 

 

दरम्यान, ‘पठान’ चित्रपट २५ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटविषयीचे वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!