Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“…तर काय परिणाम होतात हे आता चित्रा वाघ यांना समजेल”: ‘यांचे’ मोठे ट्विट!

0 320

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यांचा दावा कोर्टाने दाखल करून घेतला आहे. दावा कोर्टाने दाखल करून घेताच मेहबूब शेख यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

 

 

मेहबूब शेख म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे आता चित्रा वाघ यांना समजेल, तसेच कोर्टाच्या ऑर्डरची प्रतही पोस्ट केली आहे. संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलू नये याचेही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल, असं मेहबूब शेख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

तसेच ते पुढे म्हणाले, “स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करा. स्वतःला न्यायधीश समजणाऱ्या चित्रा वाघ यांनी शिरूर कासार येथे येऊन माझ्या विषयी जे बदनामीकारक वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती, अशी माहिती त्यांनी या ट्विटमध्ये दिली आहे.

 

दरम्यान, एका तरुणीने मेहबूब शेख यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उचलून धरत शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर या मुलीने घुमजाव करत चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शेख यांनी कोर्टात धाव घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.