पुणेः सुषमा अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवी-देवता तसे साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अंधारे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे.तसेच सुषमा अंधारे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी वारकरी संप्रदायातून उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जात आहे. अशातच आता यावर सुषमा अंधारे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
अंधारे म्हणाल्या, “पक्षाने आदेश दिले तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, मात्र माझा राजीनामा घेण्याआधी तुम्ही राज्यपालांचा राजीनामा घेणार का?, राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय. माझ्यामागे ईडी लावता येत नाही, म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही. आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती.
दरम्यान, त्या आज माध्यमांशी पुण्यात बोलत होते.