नाशिक :शुक्रवारी नाशिकमधील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
माहितीनुसार, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, डी. जी. सुर्यवंशी, सुदाम ढेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुळ, ज्योती खोले यांच्यासह अन्य माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.