Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे  राशीभविष्य, शुक्रवार १६ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 643

 

मेष:-

Manganga

मनात आकर्षण भावना वाढू शकते. छोटे प्रवास घडतील. दिवस मनाजोगा जाईल. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता.

 

 

वृषभ:-

कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल. अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. नवीन करार पूर्णत्वास जाईल.  घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल.

 

 

मिथुन:-

घरात शिस्त बाळगाल. महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. नातेवाईक भेटायला येतील.निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते.

 

 

कर्क:-

प्रलंबित कामे मार्गी लावाल. तुमचे कौशल्य पणाला लावा. व्यावसायिक प्रगती करता येईल. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

 

 

सिंह:-

मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. आपल्याला आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. मानसिक शांतता लाभेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

 

 

कन्या:-

एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. नसत्या काळज्या करू नका. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल.

 

 

तूळ:-

मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल.  आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल.

 

 

वृश्चिक:-

तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील.

 

 

धनू:-

कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल.  स्वत:वरील  विश्वास कायम ठेवावा.  कौतुकास पात्र व्हाल. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते.

 

 

मकर:-

दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

 

 

कुंभ:-

मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका. मानसिक प्रसन्नता लाभेल.  तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

 

 

मीन:-

जुनी कामे मार्गी लावाल. सासुरवाडीची मदत मिळेल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!