Latest Marathi News

BREAKING NEWS

दहावीच्या विद्यार्थीनीने महिलांच्या सुरक्षेसाठी बनवले अनोखे फूटवेअर; जाणून घ्या अधिक माहिती!

0 304

बेळगाव : कर्नाटकातील कलबुर्गीच्या दहावीत शिकणाऱ्यांना एका शाळकरी विद्यार्थीनीने महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या चपला तयार केल्या आहेत, ज्यामुळे हल्लेखाेरापासून महिलांना स्वत:चा बचाव करता येणार आहे. कलबुर्गीच्या दहावीत शिकणाऱ्या विजयलक्ष्मी बिरादर या विद्यार्थीने या अनोख्या फूटवेअरची निर्मिती केली आहे.

माहितीनुसार, विजयलक्ष्मी बिरादर हीला अलिकडेच गोवा येथे भरलेल्या इंटरनॅशनल इन्वेशन अॅण्ड इनोव्हेंशन एक्स्पो अवार्डमध्ये गौरवण्यातही आले आहे. विजयलक्ष्मी बिरादर हीने विकसित केलेल्या या अॅण्टी रेप फुटवेअरमध्ये बॅटरींचा वापर केला आहे. त्यामुळे हल्लेखोराशी प्रतिकार करताना या चपलांचा फायदा होणार आहे. यातून बाहेर पडणाऱ्या विद्युत लहरींमुळे हल्लेखोराला करंट बसेल. तसेच या फुटवेअरमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याने नातेवाईकांना संदेश जाऊन ठिकाण कळण्यास मदत होईल असे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे. विजयलक्ष्मी सातवीत असल्यापासून या प्रकल्पावर काम करीत होती.

Manganga

 

 

दरम्यान, बाजारात महिलांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट वॉचेस, बेल्ट सारखी अनेक उपकरणे आली आहेत.मात्र या वस्तू तुम्ही घरी विसरण्याची जास्त शक्यता असते. पण चपला तर तुम्हाला घरातून बाहेर पडताना घालाव्या लागतातच त्यामुळे हे डिव्हाईस अधिक उपयोगाचे असल्याचे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!