मुंबई : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे या एका वक्तव्यामुळे वादात अडकल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, “संतांच्या किंवा महापुरुषाच्या बाबतीत चुकीचं विधान करू नये. तसं विधान केल्यास माफी मगितली पाहिजे, कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये”, असंही रोहित पवार म्हणालेत.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा “संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं?”, असं म्हटलेला व्हीडिओ सध्या चर्चेत आला आहे. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अशी मागणी झाली.