Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्नीचा सरपंच पदासाठी निवडणूक प्रचार करताना पतीचा अचानक मृत्यू; झाले काय जाणून घ्या…!

0 901

मुंबई: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच, लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीच्या सरपंचपदाचा प्रचार करत असताना पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरूड ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. गुरूवारी अमृता यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, प्रचाराची जाहीर सभा सुरू असताना अमर नाडे यांनी भाषण सुरू केलं. मात्र, भाषण करत असताना अचानक ते स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Manganga

 

दरम्यान, अमर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!