जळगाव : आज सोन्याच्या दरात साडेसातशे रूपयांची तर चांदीच्या दरात पंधराशे रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास सोन्याच्या दरात बाराशे रूपयांची तर चांदीच्या दरात चार हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे.
माहितीनुसार, जळगावचे सोने शूध्द असल्याने त्याला देशभर मागणी आहे. एक डिसेंबरला सोन्याचे दर प्रती तोळा ५३ हजार (विना जीएसटी) होते. तर चांदी ६४ हजार (विना जीएसटी) होते.तर आजचे दर सोने ५४ हजार २०० तर चांदीचे दर ६८ हजारांवर पोचले आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर सातत्याने सोने, चांदीच्या दरात वाढ होत आहे.