मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार आता पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, खरी शिवसेना कुणाची? याबद्दल सुरु असलेल्या सुनावणीचा निकाल २० जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय येताच, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या दमाच्या आमदारांना संधी देणार असल्याची माहिती आहे.