दिघंचीत भाजपा ला खिंडार : शेकडो युवकांचा तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेला पाठिंबा
दिघंची : दिघंचीत भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते मा.ग्रा.पं. सदस्य तसेच पंडित दिन दयाळ प्रशालेचे चेअरमन मोहनभाऊ मोरे तसेच गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक तसेच भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेच्या दिघंची ग्रामविकास पॅनेल च्या सर्व 18 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
दिघंची : दिघंचीत भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते मा.ग्रा.पं. सदस्य तसेच पंडित दिन दयाळ प्रशालेचे चेअरमन मोहनभाऊ मोरे तसेच गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक तसेच भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेच्या दिघंची ग्रामविकास पॅनेल च्या सर्व 18 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
तानाजीराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की यावेळी सर्व च्या सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडणून येतील. दिघंचीला विकासकामात भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात 26 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका लागल्या आहेत पण दिघंची मधील आमचे सर्व युवा कार्यकर्ते जोमाने काम करत असतात. त्यामुळे दिघंची मध्ये विक्रमी विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी जाहीर पाठिंबा दिलेल्या सर्व युवकांचा तसेच पदाधिकाऱ्यांचे स्वागत अमोल मोरे यांनी केले. दिघंचीच्या सर्वांगीण विकसाचा शब्द देत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. तसेच आम्ही दिघंची मध्ये केलेली विकास कामे घेऊन जनतेसमोर जात आहोत. परंतु आम्हाला थांबवण्यासाठी खालच्या पातळीवरील राजकारण केले जात आहे. पण च्या सामान्य जनता आमच्यासोबत आहे.
यावेळी भाजपचे मा.तालुकाध्यक्ष आणासाहेब जाधव यांनी सांगितले की ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील विकासकामाचे व्हिजन नागरिकांना हवे असते. मागील पाच वर्षात अमोल मोरे यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळात केलेली विकासकामे पाहता दिघंचीचा विकास रथ त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विकास कामे खेचून आणेल यात शंका नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या दिघंची ग्रामविकास पॅनेल च्या सर्व च्या सर्व 18 उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
ॲड महेश तसेच यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी गेली अनेक वर्षापासून समाजकारणात आहे. केवळ निवडणुकीपुरते राजकारण न करता गावच्या विकास कामाला साथ देणाऱ्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे. असे म्हणत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
मुक्ता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मागीला 5 वर्षात विक्रमी विकास कामे दिघंचीत झाली आहेत. हाच विकासकामांचा वेग पुढे सुरु राहावा असा आशावाद व्यक्त करत यापुढे देखील त्याचा गतीने गावाचा चौफेर विकास व्हावा अशी मागणी केली.
यावेळी बाळासाहेब होनराव यांनी सांगितले की दिघंची मध्ये झालेल्या विकास कामांमुळे दिघंचिमध्ये बदल करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. केलेल्या कामाचे आम्हाला समाधान आहे. गेली 5 वर्षे सक्षम पणे आम्ही दिघंची करांच्या विश्वासास साजेशी कामे केली आहेत. यापुढे देखील हाच विकासकामाचा वेग ठेवण्याची ग्वाही दिली.
यावेळी दिघंची बस स्थानका पासून कार्यकर्त्यांसह मोहनभाऊ मोरे व अण्णासाहेब जाधव यांच्या बरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी गावामधून पद यात्रा काढत त्यांची सांगता सिद्धनाथ मंदिरामध्ये करण्यात आली.सर्व जाहीर पाठिंबा देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.
यांचा जाहीर पाठींबा
भाजपाचे ज्येष्ठ नेते मोहन (भाऊ) मोरे, भाजपाचे मा तालुका अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, ॲड महेश मोरे, गणेश माने सर, शंकर मोरे, विनोद पुसावळे, किरण पुसावळे, सुमित पुसावळे, किरण जाधव, गणेश पुसावळे, अभिजीत पुसावळे, दिनेश पुसावळे, तुषार पुसावळे, शुभम पुसावळे ह्या भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह २०० हुन अधिक युवक उस्फूर्तपणे पाठिंबासाठी हजर होते.