Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, गुरुवार १५ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 647

मेष:-
प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. घरातील वातावरण चांगले राहील. मनातील इच्छा बोलून दाखवाल. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांति मिळेल.

 

 

वृषभ:-
मानसिक शांतता लाभेल. आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल.

Manganga

 

मिथुन:-
भावंडांची चांगली मदत होईल. जुनी उधारी वसूल होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल.

 

कर्क:-
व्यापारी वर्गाला चांगला दिवस. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. मानसिक चंचलता जाणवेल.

 

सिंह:-
कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल.

 

कन्या:-
कौटुंबिक खर्चाला आळा घालावा. मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी.

 

तूळ:-
नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल.

 

वृश्चिक:-
कामातील समस्या दूर होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन ओळख होईल. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल.

 

धनू:-
कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल. नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. राजकारणापासून दूर राहावे. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा.

 

मकर:-
अति विचार करत बसू नका. काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. भावंडांची बाजू समजून घ्यावी. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा.

 

कुंभ:-
भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

 

मीन:-
संयमाने कामे करावीत. अंग मेहनतीला मागे हटु नका. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!