मुंबई: यशवंतराव चव्हाण पुरस्कार समितीत पुरस्कार देण्यात आलेल्या ‘फ्रॅक्चर फ्रिडम’ या पुस्तकावरुन सध्या शिंदे – फडणवीस सरकारवर चौफेर टिका केली जात आहेअशातच आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सद्यस्थितीत चांगल्या माणसांनी राजकारणात पडू नये असे म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भालचंद्र नेमाडे म्हणाले, “सद्यस्थितीत राजकारणात चांगल्या लोकांनी पडू नये अशी परिस्थिती झाली असून सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का ? दहा ते पंधरा टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या काय खावं याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावं याचा विचार केला पाहिजे, आपणच अशा हरामखोरांना निवडून देतो, त्याचेच हे फळ आहे, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, जळगावमध्ये एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.