मुंबई : नितेश राणे हे साताऱ्यातील सभेत बोलताना धमक्या देत होते. पोलीस ठाण्यात जाऊन ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही ते आक्षेपार्ह विधान करत होते.यावर अंबादास यांनी वक्तव्य केले आहे.
दानवे म्हणाले,नितेश राणे यांच्याबद्दल विशेष काही बोलण्याची गरज नाही. तो कोणाविषयी काहीही बोलत असतो. नितेश राणे यांच्या बोलण्याकडं सिरीअसली घेण्याची गरज नाही. सूर्यावर थुंकल्यानं काही फरक पडतो का, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.
तसेच ते आज शिवसेनेत सामील झालेल्या नेत्यांबद्दल बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त नेते शिवसेनेत येत आहेत. गंगापूर, वैजापूर आणि पैठण या तीन विधासभेतून नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधून शिवसेनेला पाठिंबा मिळत आहे. काही केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री हे काही काळचं असतील. लोकं लवकरच त्यांना घरी बसवतील, असा टोला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला.