“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवरुन हटवून ‘यांचे’ फोटो छापण्याची मागणी’: केंद्र सरकारने संसदेत मांडले मत!
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपती बप्पा यांचा फोटो छापण्याची मागणी केली होती. याप्रश्नी आता केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर दिले आहे. भारतीय नोटांवर स्वातंत्र्य सेनानी, मोठ्या व्यक्ती, देवी आणि देवता, पशू यांचे छायाचित्र छापण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो भारतीय नोटांवरुन हटविण्यासंदर्भातील मागणी, प्रस्तावाला केंद्र सरकारने कडाडून विरोध केला आहे.
माहितीनुसार, भारतीय नोटांवर देवी-देवतांचा फोटो छापण्याची मागणी फार जुनी आहे. लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या फोटोसाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या मागणीसंदर्भात काय उत्तर दिले? केंद्र सरकारची काय योजना आहे? याविषयीची माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देण्यात आली.

दरम्यान, आरबीआय अॅक्ट 1934 च्या नियम 25 अंतर्गत केंद्रीय बँक आणि केंद्र सरकार मिळून नोट आणि त्यावरील छायाचित्राविषयीचा निर्णय घेते.छायाचित्र बदलवायचे असेल अथवा काढायचे असेल, नवीन फोटो लावायचा असेल तर याविषयीचा निर्णय केंद्रीय बँक अथवा केंद्र सरकार एकट्याने हा निर्णय घेत नाही. संयुक्तरित्या हा निर्णय घेते.