मुंबई: हिंदू धर्म, संत परंपरेवर केलेल्या टीकेवरून वारकऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाच्या पक्षातून काढून टाका, अशी मागणी केली जात आहे.त्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आशिष शेलार म्हणाले, ‘ आम्ही सुषमा अंधारे यांच्यावर बोलणं टाळतो. त्या हिंदू समाज, धर्म आणि संत परंपरेला इजा पोहोचवणारे आहेत. हिंदू धर्माची थट्टा करणारे आहेत. अंधारे यांनी त्यांच्या पूर्व आयुष्यात केवळ हिंदू धर्मावर टीका केली आहे’.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पण आता त्यांनी वारकरी संप्रदायाला नख लावलं आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. एखाद्या समाजाच्या भावना उत्तेजित करण्यासारखा कोणता गुन्हा घेता येईल का ? हे पाहावे लागेल. उद्धव ठाकरे हे सुषमा अंधारेंवर कारवाई करणार का ? त्यांची भूमिका काय ? असा सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.