पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने कोश्यारींविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी रणशिंग फुंकले आहे. त्याचवेळी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या एका विधानाची भर पडली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या, “उदयनराजे नक्कीच राजीनामा देतील असं मला वाटतंय. तसेच, मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलू नये. सिल्व्हर ओकवर लोकांना घुसवणं योग्य आहे का? असा सवाल त्यांनी सदावर्ते यांना विचारला.

तसेच, सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचा एक सेल माझ्याविरोधात सक्रिय झाला आहे. मला डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे. या मागे भाजपचा हात आहे, असा आरोप करतानाच माझ्यामुळे जर संतांच्या आणि वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं त्या जाहीरपणे म्हणाल्या.