मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी हि सिल्वर ओक या मुंबईमधील निवासस्थानी संबंधित युवकाने फोन करुन दिली होती. दरम्यान, या बातमीनंतर मुंबईमधील पोलिसांनी बिहारमधून या आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात आता नारायण कुमार सोनी याच्याविरोधात पोलिसांनी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, नारायण कुमार सोनी हा गेल्या १० वर्षांपासून पुण्यात राहत होता. पुण्यात वास्तव्यास असतानाच या युवकाच्या पत्नीने त्याला सोडून दुसऱ्या पुरूषासोबत लग्न केले आणि त्याच्यासोबत राहू लागली. संबंधित युवकाने या बद्दलची तक्रार दाखल केली होती. मात्र शरद पवारांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळेच आपण त्यांना धमकीचे फोन केले असे या व्यक्तीने सांगितले आहे.

दरम्यान, शरद पवारांना धमकी देणारा नारायण कुमार सोनी हा तरुण मनोरुग्ण असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.