मुंबई: महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून संजय राऊत टोला यांनी लगावला आहे.
यावेळी राऊत म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री असे म्हणतात की, अमित शहा यांना भेटून काही फायदा नाही, मात्र आम्ही म्हणतो गृहमंत्र्यांना भेटून फायदा आहे. खरंच गृहमंत्री मध्यस्थीचं काम करणार असतील आणि जर यातून सकारात्मक निर्णय होणार असतील तर यावर टीका करण्याचा कारण नाही. गृहमंत्र्यांनी गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी माणसावर अन्याय होतोय त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्यावा असे आवाहन देखील संजय राऊत यांनी यावेळी केले.

तसेच ते पुढे म्हणाले, “ गृहमंत्री हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत. कोल्हापूरला सीमावादाचे सगळ्यात जास्त चटके झळ ही कोल्हापूरला बसते आहे. त्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती आहे. कोर्टात अनेक प्रकरणं आहेत. पण केंद्र सरकार अशा प्रश्नावर बोलूच शकत नाहीत, असं नाही. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्तिथ केला आहे.