औरंगाबाद: शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. औरंगाबादमधील भाजपच्या दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं आहे.
माहितीनुसार, भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अँड. प्रतापराव पाटील निंबाळकर, (तालुका अध्यक्ष पंचायत समिती), प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, कृ. उ.बा.स.यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर उपस्थित होते.