पुणे: १३ डिसेंबरला पुण्यातील हडपसर परिसर एका १६ वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी , तक्रारदार व्यक्ती हे पुण्यातील फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात राहतात. १३ डिसेंबरला घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती.सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा त्याठिकाणी आला. त्याने गायीचे हातपाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात येताच, त्यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित मुलाविरोधात तक्रार दिली.

दरम्यान, तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर भादवी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतले आहे.