Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, बुधवार १४ डिसेंबर; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 712

मेष:-
जोडीदाराची साथ मिळेल.तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल.

वृषभ:-
प्रवासात काळजी घ्यावी. मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. जुनी कामे पूर्ण करता येतील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल.

Manganga

 

मिथुन:-
स्वप्नवत वातावरणात रमून जाल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवावे.

 

कर्क:-
आवडीवर खर्च कराल. उगाच चिडचिड करू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका.

 

सिंह:-
मानसिक आंदोलन ओळखून वागावे. आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस.

 

कन्या:-
दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील.

 

तूळ:-
आपले स्वत्व राखून वागाल. जवळची व्यक्ती भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे.

 

वृश्चिक:-
कौटुंबिक समाधान शोधाल. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी.

 

धनू:-
छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल. अचानक धनलाभ संभवतो.

 

मकर:-
अनावश्यक खर्च संभवतो. भागीदाराची बाजू विचारात घ्या. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

 

कुंभ:-
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराला खुश करावे लागेल. लहान प्रवास संभवतो.

 

मीन:-
जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. व्यवसायात प्रगती करता येईल. मुलांशी मतभेद संभवतात. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!