Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य पण झाले भलतेच….!

0 757

मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये पत्नीपासून सुटका मिळावी आणि कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी पतीने आपल्या पत्नीला विषारी सापाच्या दंशाने मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी सहा तासात दोनवेळा सर्पदंश केला. मात्र दोन वेळा सर्पदंश होऊन, विषारी इंजेक्शन देऊनही महिला यातून बचावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, मंदसौरमधील माल्या खेडी गावात राहणारा मोजिम अजमेरी याचा आधीच विवाह झाला होता. मात्र तस्करी प्रकरणी मोजिम तुरुंगात गेल्यानंतर त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोजिमने हालिमासोबत दुसरा विवाह केला. त्यानंतर अचानक मोजिमची पहिली पत्नी त्याच्या आयुष्यात परत आली. याची माहिती हलिमाला मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. हलिमापासून सुटका मिळवण्यासाठी मोजिमने तिला संपवण्याचा कट रचला. यासाठी मोजिमचे साथीदार रमेश आणि काला यांनी एका बॅगेत विषारी साप भरुन आणला. मग तिघांनी मिळून हलिमाजवळ विषारी साप सोडून सर्पदंश करवला. विषारी इंजेक्शनही दिले. तरीही हलिमाचा जीव गेला नाही म्हणून पुन्हा सर्पदंश करवला. यानंतर तिला गंभीर अवस्थेत सोडून सर्वजण पळून गेले.

Manganga

 

दरम्यान, शेजाऱ्यांनी याबाबत हलिमाच्या वडिलांना कळवली. त्यानंतर हलिमाच्या वडिलांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर हलिमाची प्रकृती ठीक आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!