Latest Marathi News

मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींवरील कलम ३०७ मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश!

0 365

मुंबई: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे या तरुणावर लावण्यात आलेले कलम ३०७ मागे घेण्याचे, तसेच याप्रकरणी निलंबीत करण्यात आलेल्या ११ पोलिसांचे निलंबनही मागे घेण्यात यावे असे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी दिले आहेत.

 

भाजप नेते तथा तंत्र व उच्चशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी औरंगाबादेत महापुरुषांबद्दल वादग्रस्त केल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी शाईफेक करणाऱ्या आरोपी मनोज गरबडेविरोधात पोलिसांनी कलम ३०७ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. तसेच, ठपका ठेवत ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते, तसेच एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे.

Manganga

 

दरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना मनोज कलम ३०७ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ११ पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात यावे असे आदेशही फडणवीसांनी पोलिसांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!