मुंबई: उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनने नेहमीच चर्चेत असते. तिची फॅशन काहींना आवडते तर काहींच्या डोक्यात जाते. उर्फीने नुकताच तिचा एका भन्नाट आऊटफिटमधील व्हिडिओ शेअर केला आहे.तिचा हा व्हिडिओ पाहून पाहणारे चक्रावून जाणार आहेत.
उर्फीने तिच्या व्हिडिओमध्ये घातलेल्या आऊटफिटमध्ये काळ्या रंगाच्या पट्ट्यांचा वापर केला आहे. या पट्ट्या वापरून तिने एक स्विमसूट तयार केला आहे. तसेच तिने केसांना कर्ल करून केस मोकळे ठेवले आहेत. शेमलेस, डिस्टेस्टफ़ूल, वल्गर पण तरीही सुंदर, असे म्हणत तिने तिच्या या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत.