आटपाडी : बाळेवाडीत आचारसंहितेचा भंग : १२ जणासह ५० ते ६० लोकांवर गुन्हा दाखल : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विना परवाना प्रचाराचा शुभारंभ करणे आले अंगलट
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता प्रचाराचा शुभारंभ करून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल १२ जणासह अनोळखी अशा ५० ते ६० लोकांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक लागली आहे. त्यामुळे स्वामी सद्गुरू या पॅनेलला प्रचाराचा शुभारंभ धुळोबा मंदिर कोळेकर वस्ती येथे करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांच्या भरारी पथकाने याठिकाणी भेट देवून प्रचाराला शुभारंभ करण्याकरिता कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट होवून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे संजय भिकू कोळेकर, मारुती सूऱ्याबा यमगर, तुकाराम शंकर राजगे, जगन्नाथ बाबा कोळेकर, जगन्नाथ बापू कोळेकर, दिलीप संपत कोळेकर, रामचंद्र नामदेव कोळेकर, पोपट धोंडीबा खरात, सुरेश बापू खताळ, दाटू विठोबा कचरे, विजय सत्यवान राजगे, उद्लिंग बापू खरात सर्व रा. बाळेवाडी यांच्यासह ५० ते ६० अनोळखी लोकांच्या विरुद्ध संभाजी चरापले यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ कोरवी करीत आहेत.