मुंबई: सातारा जिल्ह्यातील पाटण येथे आज हिंदूत्ववादी संघटनांतर्फ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान नांदगाव येथील बैठकीत तुम्ही तुमच्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर एक रुपयाचा निधी देणार नाही अशी एक प्रकारे धमकी दिल्याची चर्चा आहे या प्रश्नावर राणेंनी प्रत्युत्तर दिले.
राणे म्हणाले, “माझे गावातील लोक माझे आहेत. त्यांच्याशी मी कसे बोलायचे हे मी ठरवेनअसे राणे म्हणाले.

तसेच, आदि्त्य ठाकरे यांचे प्रतिक्रियेविषयी राणेंना विचारले असता त्यांनी ज्याला आपला मतदारसंघ कोठुन कोठे पर्यंत आहे हे माहिती नाही. वरळी का दिनो मारियाचे घर हेही माहिती नाही. आदित्य ठाकरे स्वत: घाण असल्याने त्यांना सर्व घाण दिसते असे त्यांनी वक्तव्य केले.