Latest Marathi News

“….त्यामुळे उदयनराजेंना अटक करा”: ‘यांची’ मागणी!

0 626

पुणे : आज पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. पण पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे.

 

सदावर्ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असं सदावर्ते म्हणालेत.

Manganga

 

 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.त्यामुळे आज पुण्यात बंद पाळण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!