पंढरपूर: पंढरपूर काॅरिडाॅर करताना कोणाचीही घर, दार आणि मंदिरी न पाडता पंढरपूरचा विकास करू असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावर मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
पंढरपुरातील कोणाचीही घर दार न पाडता काॅरिडाॅर केला तर देवेंद्र फडणवीस यांची हत्तीवरून पंढरपूर शहरातून मिरवणूक काढू अशी घोषणा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
दरम्यान, या बैठकीत कॉरिडॉरमध्ये लोकांची घरदार वाचवण्यासाठी आगामी काळात कुठली भूमिका असावी याबाबतही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.