मुंबई: येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला राज्य विधिमंडळाच्या सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे.
माहितीनुसार, कामकाजाचा पहिला आठवडा हा अनेक वादग्रस्त प्रकरणं आणि राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर चर्चांवर जाईल. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणारा असेल. तर, दुसऱ्या आठवड्यात अधिकाधिक शासकीय कामकाज असेल. त्यामुळे पहिला आठवडा सभागृहात आणि बाहेर देखील लक्षवेधी असेल.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याचा मुद्दा अधिवेशनात केंद्रस्थानी असेल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन देखील विरोधक सत्तापक्षाला घेरण्याची शक्यता आहे.