मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवास्थानी फोन करून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’, अशी धमकी दिली आहे.
माहितीनुसार, काल शरद पवार यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर लगेचच ही धमकी आला. फोन करणाऱी व्यक्ती हिंदीतून बोलत होती.

दरम्यान, पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या व्यक्तीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.