मुंबई: काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरियां यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी पटेरिया यांना दमोह येथील हट्टा येथून पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया हे रविवारी पन्ना येथील एका कार्यक्रमाला संविधान वाचवायचं असेल, तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा, असे धक्कादायक विधान केले होते.

दरम्यान, त्यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पन्ना पोलिसांनी पटेरिया यांच्याविरोधात शांतता भंग आणि असंतोष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांनी आज सकाळी (13 डिसेंबर) राजा पटेरिया यांना दमोह येथील हट्टा येथून पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली आहे.