अमरावती: अमरावती शहरातील शासकीय अभियंता महाविद्यालय समोर सिटी बसने चिरडल्याने विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू झाला आहे. नेहा इंगोले (वय २१) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नेहा इंगोले ही आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर जात असताना विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालया समोर दुचाकीला ब्रेक लावला. यानंतर रस्त्यावर दोघेही पडले. यावेळी मागून येणाऱ्या सिटी बसचे मागील चाक नेहाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. नंतर नेहाला खाजगी रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.