मुंबई: माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही. निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड दमच आमदार नितेश राणे यांनी कणकवली नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुक प्रचारादरम्यान दिला हाेता. त्यावर आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे.
आमदार नाईक म्हणाले राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी हे माझ्या खिशात असल्याचे राणे म्हणत आहेत. यालाच सत्तेचा माज म्हणतात. या निवडणुकांमध्ये आम्ही जिंकूच. त्यांचा पराभव अटळ असल्याने त्यांचा त्रागा हाेत आहे. त्यांचा माज निश्चित जनता उतरवेल असा विश्वास नाईक यांनी नमूद केला.

तसेच ते पुढे म्हणाले, “नितेश राणेंचे वडील नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्यांना ही असाच सत्तेचा माज झाला होता, तो माज सिंधुदुर्गच्या जनतेने उतरवला होता अशी टिप्पणी आमदार वैभव नाईक यांनी भाजप आमदार नितेश राणेंच्या कणकवलीतील वक्तव्यावर केली.