मुंबई: संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करा, असं विधान मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया यांनी केलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया हे रविवारी पन्ना येथील एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी पटेरिया म्हणाले, येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात येतील, संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करा, असं विधान पटेरिया यांनी केले.

दरम्यान, पटेरिया यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच, भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, भाजपा प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी पटेरिया यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे.