मुंबई: सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम बापाने स्वत:च्याच अवघ्या ११ वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, पीडितेची आई आणि लहान बहीण कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात नराधम बाप आणि पीडिता होती. पीडिता ही स्वयंपाक खोलीत पोहे बनवत असतानाच नराधम बापाने पीडितेला समोरील खोलीत खेचत नेत तिचा विनयभंग करून लैंगिक चाळे केले. पीडितेची आई घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार पीडितेने आईसमोर कथन केला. आईने याबाबत पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, नराधमाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, आईने पीडितेला सोबत घेत थेट सेवाग्राम पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.