Latest Marathi News

किनारा साफ करताना सापडली नोटांनी भरलेली बॅग, उघडून पाहिलं तर….!

0 789

वसई : वसईतील भुईगाव किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम सुरु होती. या स्वच्छता मोहिमेदरम्यान तब्बल 57 हजार रुपये आढळून आले. स्वच्छा मोहिम सुरु असताना काही नोटा दोघा व्यक्तींना आढळल्या. मोजून पाहिल्या तर त्याची किंमत तब्बल 57 हजार रुपये असल्याचं समोर आलं. पण आढळून आलेल्या सर्व नोटा या जुन्या चलनातील होत्या.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, वसईतील लिसबन फराव आणि सुजाव फराव हे आपल्या दोन मुलांसब भुईगाव किनाऱ्यावर रविवारी स्वच्छता मोहीम राबवत होता. त्यावेळी त्यांना एक बॅग आढळून आली. बॅगमध्ये चक्क जुन्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. या मध्ये 1 हजार रुपयांच्या 3 आणि इतर 500 रुपयांच्या नोटा होता. या नोटा मोजल्या असत्या त्यांची किंमत 57 हजार रुपये इतकी आढळून आली.

Manganga

 

दरम्यान, फराव कुटुंबीयांना जुन्या नोटांनी भरलेली ही पैशांची बॅग थेट वसईतील भुईगाव पोलीस चौकीत जमा केली. आता पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!