औरंगाबाद औरंगाबादच्या सिल्लोड येथे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने आपल्या पतीविरोधात केला आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा विवाह औरंगाबाद येथील बायजीपुरा येथे पार पडला. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याने पीडित महिला आपल्या माहेरी राहत होती.तसेच, शिविगाळ करत व जिवे मारण्याची धमकी देत पतीने इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापीत केले, असे महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी आव्हाना रोड परिसरात राहणाऱ्या विवाहित महिलेने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध बलत्काराचा गुन्हा दाखल केला आहे.