मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल १३ महिन्यानंतर अखेर जामीन मंजूर झाला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख तुरूंगाबाहेर येतील.
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरूंगात होते. दरम्यान, आज १३ महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे , अनिल देशमुख यांना जामीन मंजूर होताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
