औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घटांब्री येथील एका नवविवाहित जोडप्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली आहे. विकास तायडे आणि सपना तायडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, विकास तायडे आणि सपना तायडे यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. रविवारी विकास हा काही कामानिमित्त सिल्लोड शहरात गेला. त्याचवेळी पत्नी सपना हिने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पत्नी सपनाने आत्महत्या केल्याची बातमी कळताच त्याने सुद्धा रस्त्याने येत्या वेळेस अंभईजवळील बोरगाव येथील खेळणा नदीच्या पुलावर गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. व विकास आणि सपना यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.